बजाज ऑटो आणणार जगातील पहिली CNG बाईक, 'या' दिवशी होणार लाँच

Authored by Navnath Bhosale | ET Online | Updated: 20 Jun 2024, 12:00 pm

देशाच्या बहुतांश भागात पेट्रोलचे दर अनेक दिवसांपासून 100 रुपयांच्या आसपास आहेत. अशा परिस्थितीत सीएनजी बाईक हा एक परिपूर्ण पर्यायी उपाय ठरू शकतो.

मुंबई :बजाज ऑटो जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च करणार आहे. या बाईकची पहिली झलक 5 जुलै रोजी समोर येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुण्यात बजाजच्या सीएनजी बाइकचे अनावरण होणार आहे. या बाईकचे नाव काय असेल याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या बाईकचे नाव 'ब्रुझर' असू शकते असे बोलले जात आहे. हे नाव कंपनीने अलीकडेच भारतात ट्रेडमार्क केले आहे.
Bajaj Auto to launch worlds first CNG bike
देशाच्या बहुतांश भागात पेट्रोलचे दर अनेक दिवसांपासून 100 रुपयांच्या आसपास आहेत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांकडे पूर्णपणे शिफ्ट होणे अजून खूप दूर आहे. अशा परिस्थितीत सीएनजी बाईक हा एक परिपूर्ण पर्यायी उपाय ठरू शकतो. या संधीचा फायदा घेणारी बजाज ही पहिली कंपनी असेल.

बजाज सीएनजी बाईक दुहेरी क्रॅडल फ्रेमवर आधारित असू शकते आणि त्यात 'स्लोपर इंजिन' असू शकते. या इंजिनचा तपशील अद्याप समोर आलेला नाही मात्र हे 110-150 सीसी इंजिन असण्याची शक्यता आहे. नवीन बजाज सीएनजी बाईकमध्ये 125 सीसी इंजिन मिळू शकते. ते पेट्रोल आणि सीएनजी या दोन्हीवर चालण्यास सक्षम असेल. रायडर दोन्ही इंधन पर्यायांमध्ये सहजपणे स्विच करण्यास सक्षम असेल. तसेच 5 स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध होऊ शकतो.

एका अहवालानुसार, बजाज सीएनजी बाईकमधील सीएनजी टँक बाईकच्या संरचनेतच इंटीग्रेट केली जाईल. हा सेटअप सीएनजी टाकीला अधिक संरक्षण देईल. पेट्रोल टाकी फक्त त्याच्या मानक स्थितीत असेल. पेट्रोलच्या इंधन टाकीची क्षमता पेट्रोल बाईक इतकीच असू शकते.

अहवालानुसार, सीएनजी संपल्यास बॅकअप म्हणून काम करण्यासाठी बाईकमध्ये एक लहान पेट्रोल टाकी देखील आहे. बजाज ऑटोचा दावा आहे की नवीन सीएनजी बाईक ऑपरेटिंग आणि इंधन खर्च 50-65 टक्क्यांनी कमी करण्यास सक्षम असेल. ही बाईक दोन प्रकारात लॉन्च केली जाऊ शकते.



Navnath Bhosale यांच्याविषयी
Navnath Bhosale Senior Digital Content Producer
इकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर्वी पुढारी, मी मराठी, नवशक्ती, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More