Please enable javascript.येस बँक 25 जूनला मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, शेअरची किंमत 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता - yes bank board to consider fund raising via debt securities on 25 june stock target is here | The Economic Times Marathi

येस बँक 25 जूनला मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, शेअरची किंमत 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

Authored by Tushar Sonawane | The Economic Times Marathi | Updated: 21 Jun 2024, 7:49 am

बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी (25 जून 2024) रोजी मुंबई येथे होणार आहे. कर्जरोखे जारी करून बँक कर्ज घेण्यास किंवा पैसे उभारण्यास सक्षम करण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत विचार केला जाईल.

 
yes bank board to consider fund raising via debt securities on 25 june stock target is here
मुंबई : खाजगी क्षेत्रातील येस बँक लिमिटेडने (Yes Bank Ltd) निधी उभारण्याची योजना आखली आहे. बँकेने गुरुवारी (20 जून) जाहीर केले की त्यांच्या संचालक मंडळाची मंगळवारी (25 जून 2024) रोजी मुंबईत बैठक होणार आहे. कर्जरोखे जारी करून कर्ज घेणे किंवा पैसे उभारण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत विचार केला जाईल. या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. प्रस्तावित निधी उभारणीच्या पर्यायांमध्ये भारतीय आणि विदेशी चलनांमध्ये कर्ज रोखे जारी करणे समाविष्ट आहे. यामध्ये नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स, बाँड्स आणि मध्यम मुदतीच्या नोट्सचाही समावेश असू शकतो.
शेअर्सची बाजारातील कामगिरी
येस बँकेच्या शेअरबद्दल बोलायचे झाले तर तो गुरूवारी थोड्या वाढीसह 23.96 रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान हा शेअर 24.64 रुपयांपर्यंत पोहोचला. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 32.81 रुपये आहे. ही किंमत फेब्रुवारी महिन्यात होती.

शेअरची किंमत
अलीकडे एका वृत्तवाहिनीवर दर्शकांच्या प्रश्नाचे उत्तर देताना बाजार तज्ज्ञ प्रकाश गाबा म्हणाले की येस बँकेच्या चार्टनुसार सध्या बॉटम आउट प्रक्रिया सुरू आहे, परंतु ती कधी पूर्ण होईल हे स्पष्ट नाही. गाबा म्हणाले की 30 रुपयांच्या वरच्या ब्रेकआउटवर शेअर 100 रुपयांवर जाईल, परंतु त्याला पाच वर्षे लागू शकतात. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने मार्च तिमाहीच्या निकालानंतर येस बँकेवर आपले "सेल" रेटिंग कायम ठेवले आहे आणि शेअरची लक्ष्य किंमत 19 रुपयांवर ठेवली आहे.
तिमाही निकाल कसे होते?
गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत येस बँकेचा नफा दुपटीने वाढून 452 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेने म्हटले की बुडीत कर्जासाठी तरतूद कमी केल्यामुळे त्याचा नफा वाढला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत बँकेने 202.43 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. खाजगी क्षेत्रातील बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षात 1,251 कोटी रुपयांचा नफा नोंदवला, जो वार्षिक आधारावर 74 टक्के जास्त आहे.

Tushar Sonawane यांच्याविषयी
Tushar Sonawane
Tushar Sonawane Digital Content Producer
इकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. डिजिटल, टीव्ही आणि प्रिंट पत्रकारितेत 4 वर्षांचा अनुभव असून राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची विशेष आवड आहे. यापूर्वी 'झी 24 तास' आणि 'सकाळ मीडिया ग्रुप'मध्ये उपसंपादक पदावर काम केले आहे. रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथून मास मीडियाचे शिक्षण घेतले असून दरम्यान लोकमत पुणे येथे स्टुडंट रिपोर्टर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात करियरला सुरुवात केली.Read More