Please enable javascript.hindustan zinc ltd shares rise to rs 683: 90 दिवसात पैसे झाले दुप्पट, आता अमेरिकन कंपनीकडून मिळाले कंत्राट, शेअर्समध्ये मोठी तेजी - hindustan zinc ltd shares rise 5 percent to rs 683 | The Economic Times Marathi

90 दिवसात पैसे झाले दुप्पट, आता अमेरिकन कंपनीकडून मिळाले कंत्राट, शेअर्समध्ये मोठी तेजी

Authored by Navnath Bhosale | ET Online | Updated: 21 Jun 2024, 3:00 pm

या वर्षी आतापर्यंत शेअर्सने 113 टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून या कंपनीचे शेअर्स असणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 194 टक्के नफा झाला आहे.

 
Hindustan Zinc Ltd shares rise to Rs 683
मुंबई : हिंदुस्थान झिंक लिमिटेडच्या शेअरच्या भावात आज पुन्हा वाढ झाली. शुक्रवारी 21 जून रोजी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक वाढून 683.95 रुपयांवर पोहोचले. हिंदुस्थान झिंक लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत वाढ होण्यामागे सामंजस्य करार असल्याचे मानले जात आहे. या झिंक उत्पादक कंपनीने सांगितले की, त्यांनी अमेरिकन कंपनी एईएसआयआर टेक्नोलॉजीज (AESir Technologies) सोबत करार केला आहे.
कच्चा माल पुरवणार
अमेरिकन कंपनी एईएसआयआर टेक्नोलॉजी पुढील पिढीतील झिंक बॅटरी तंत्रज्ञान तयार करते. हे सहज रिसायकल केले जाऊ शकते. या सामंजस्य करारानुसार, हिंदुस्थान झिंक एईएसआयआर टेक्नोलॉजीला झिंक तसेच इतर कच्चा माल पुरवेल. झिंक आधारित बॅटरी आणखी एक आधुनिक आणि उत्तम ऊर्जा साठवण उपाय प्रदान करत आहेत. कमी पैशात ते अधिक सक्षम आहे. शिवाय, त्याच्या देखभालीचा खर्चही कमी आहे. या बॅटरीचे आयुष्य 20 वर्षांपर्यंत असते.

90 दिवसात पैसे दुप्पट
गेल्या तीन महिन्यांत हिंदुस्थान झिंकच्या शेअरच्या किमती 126 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या वर्षी आतापर्यंत शेअर्सने 113 टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून हिंदुस्थान झिंकचे शेअर्स असणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 194 टक्के नफा झाला आहे.

कंपनीचे मार्केट कॅप
कंपनीची 52 आठवड्यांची उच्च पातळी 807 रुपये आणि 52 आठवड्यांची निम्न पातळी 285 रुपये आहे. नीचांकी पातळीपासूनही या शेअर्सने आतापर्यंत 140 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 2,83,941.44 कोटी रुपये आहे.

या क्षेत्रांत बॅटरीचा वापर
एईएसआयआर निकेल झिंक बॅटरी संरक्षण क्षेत्रात, अक्षय ऊर्जा, 5G दूरसंचार क्षेत्रात खूप यशस्वी ठरल्या आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या क्षमतेवर कंपनी सतत काम करत आहे.


इकॉनॉमिक टाइम्स मराठी Business News वेबसाइटवर Share Market च्या ताज्या बातम्या वाचा
Navnath Bhosale यांच्याविषयी
Navnath Bhosale
Navnath Bhosale Senior Digital Content Producer
इकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर्वी पुढारी, मी मराठी, नवशक्ती, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More