Please enable javascript.indian bank special fd scheme: 3 बँकांची विशेष एफडी योजना या महिन्यात संपणार, 8 टक्क्यांपर्यंत मिळतेय व्याज - special fd schemes of indian bank idbi bank and punjab and sind bank closing on june 30 | The Economic Times Marathi

3 बँकांची विशेष एफडी योजना या महिन्यात संपणार, 8 टक्क्यांपर्यंत मिळतेय व्याज

Authored by Navnath Bhosale | ET Online | Updated: 21 Jun 2024, 12:00 pm

तुम्हालाही कमी वेळेत अधिक परतावा मिळवायचा असेल तर या महिन्याच्या अखेरीस या एफडीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर या एफडी गुंतवणूकीसाठी बंद होतील.

 
Special FD scheme
मुंबई : अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना 30 जून 2024 पर्यंत विशेष एफडीमध्ये गुंतवणूकीची संधी देत आहेत. इंडियन बँक, आयडीबीआय बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेच्या विशेष एफडीवर 8 टक्के व्याज मिळत आहे. तुम्हालाही कमी वेळेत अधिक परतावा मिळवायचा असेल तर या महिन्याच्या अखेरीस या एफडीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर या एफडी गुंतवणूकीसाठी बंद होतील.
आयडीबीआय बँक विशेष मुदत ठेव योजना

आयडीबीआय बँक आपल्या लाखो ग्राहकांना विशेष मुदत ठेव ऑफर करत आहे. बँक 300 दिवस, 375 दिवस आणि 444 दिवसांची विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. त्यावर 7.75 टक्के व्याज मिळत आहे. ही विशेष योजना 30 जून 2024 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

आयडीबीआय उत्सव विशेष 400 दिवसांची योजना

आयडीबीआय बँकेच्या वेबसाइटनुसार, तुम्ही उत्सव एफडी योजनेत 30 जून 2024 पर्यंत गुंतवणूक करू शकता. बँक नियमित ग्राहक, एनआरआय आणि एनआरओ ग्राहकांना 444 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे. बँक गुंतवणूकदारांना ही एफडी मुदतीपूर्वी काढण्याची आणि बंद करण्याची परवानगी देते.

आयडीबीआय उत्सव एफडी योजना 375 दिवस
आयडीबीआय बँक 375 दिवसांच्या उत्सव एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी नियमित ग्राहक, एनआरआय आणि एनआरओ ग्राहकांना 7.10 टक्के व्याज देत आहे. बँक या एफडीमध्ये मुदतपूर्व पैसे काढणे किंवा पैसे बंद करण्याचा पर्याय देखील देते.

इंडियन बँक एफडी
इंडियन बँक ग्राहकांना विशेष एफडी योजना देत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक इंडियन बँक आपल्या ग्राहकांना 300 आणि 400 दिवसांची एफडीऑफर करत आहे. इंडियन बँकेच्या वेबसाइटनुसार, तुम्ही इंड सुपर 400 आणि इंड सुप्रीम 300 दिवस नावाच्या एफडी योजनांमध्ये 30 जून 2024 पर्यंत गुंतवणूक करू शकता.

इंड सुपर 400 दिवसांची एफडी योजना
इंडियन बँकेची इंड सुपर एफडी 400 दिवसांसाठी आहे. या योजनेत तुम्ही 10,000 ते 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. बँक सर्वसामान्यांना 7.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याज देत आहेत.

इंड सुपर 300 दिवस
इंडियन बँकेची इंड सुपर 300 दिवस योजना 1 जुलै 2023 रोजी लाँच करण्यात आली. तुम्ही या एफडीत 300 दिवसांसाठी 5000 रुपयांपासून ते 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करू शकता. यावर बँक 7.05 टक्के ते 7.80 टक्के व्याज देत आहे.

पंजाब आणि सिंध बँक विशेष एफडी योजना
पंजाब आणि सिंध बँक आपल्या ग्राहकांना 222 दिवस, 333 दिवस आणि 444 दिवसांची विशेष एफडी ऑफर करत आहे. या विशेष एफडीवर कमाल 8.05 टक्के व्याज उपलब्ध आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक 222 दिवसांच्या एफडीवर 7.05 टक्के, 333 दिवसांच्या एफडीवर 7.10 टक्के आणि 444 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांच्या एफडीवर 8.05 टक्के व्याज देत आहे.


Navnath Bhosale यांच्याविषयी
Navnath Bhosale
Navnath Bhosale Senior Digital Content Producer
इकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर्वी पुढारी, मी मराठी, नवशक्ती, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More