Please enable javascript.uidai extended free aadhaar card update date: आधार मोफत अपडेटची तारीख पुन्हा वाढवली, आता 'या' तारखेपर्यंत अपडेट करता येणार - uidai extended date for free update of aadhaar card till 14 september 2024 | The Economic Times Marathi

आधार मोफत अपडेटची तारीख पुन्हा वाढवली, आता 'या' तारखेपर्यंत अपडेट करता येणार

Authored by Navnath Bhosale | ET Online | Updated: 13 Jun 2024, 6:05 pm

आयडीएआयने मोफत अपडेटसाठी अनेक वेळा मुदत वाढवली आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, ग्राहकांना त्यांचा डेमोग्राफिक डेटा, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक माहिती द्यावी लागेल.

 
UIDAI extended free Aadhaar card update date
मुंबई : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत आता पुन्हा वाढवण्यात आली आहे. यूआयडीएआय (UIDAI) ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख 14 जून 2024 आहे.
यूआयडीएआयने मोफत अपडेटसाठी अनेक वेळा मुदत वाढवली आहे. आधारमध्ये मोफत अपडेट सेवा फक्त ऑनलाइन अपडेटवर उपलब्ध असेल. आधार केंद्राला भेट देऊन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला अपडेट शुल्क भरावे लागेल.

आधारमध्ये मोफत अपडेटची सेवा माय आधार (myAadhaar) पोर्टलवर उपलब्ध असेल. तुम्ही आधार केंद्रावर जाऊन किंवा स्वतः आधार ऑनलाइन अपडेट करू शकता. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, ग्राहकांना त्यांचा डेमोग्राफिक डेटा, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक माहिती द्यावी लागेल. आधारचा अनेक डेमोग्राफिक डेटा स्वतःहून ऑनलाइन अपडेट केला जाऊ शकतो. परंतु अशा अनेक गोष्टी देखील आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त आधार केंद्रावर जावे लागेल. उदाहरणार्थ, आयरिस किंवा बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागेल.

असे करा मोफत ऑनलाइन आधार अपडेट
- यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला आधार अपडेटचा पर्याय निवडावा लागेल.
- उदाहरणार्थ, पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला अपडेट ॲड्रेसचा पर्याय निवडावा लागेल.
- पुढे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी टाकावा लागेल.
- यानंतर Documents Update चा पर्याय निवडावा लागेल.
- पुढे तुम्हाला आधारशी संबंधित तपशील दिसेल.
- सर्व तपशील सत्यापित करा आणि नंतर पत्ता अद्यावत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- यानंतर आधार अपडेट प्रक्रिया स्वीकारा.
- यानंतर तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) नंबर 14 मिळेल.
- याद्वारे तुम्ही आधार अपडेटच्या प्रक्रियेचा मागोवा घेऊ शकता.


Personal Finance आणि इन्कम टॅक्सची अधिक माहिती आणि ताज्या अपडेट्स मिळण्यासाठी इकॉनॉमिक टाइम्स मराठी Business News वेबसाइटला भेट द्या
Navnath Bhosale यांच्याविषयी
Navnath Bhosale
Navnath Bhosale Senior Digital Content Producer
इकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर्वी पुढारी, मी मराठी, नवशक्ती, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More