Green Pathway: यवतमाळमध्ये होणार 'ग्रीन पाथवे'चा विस्तार; 3,000 शेतकरी कुटुंबांना मिळणार 'जल सुरक्षा'

5,000 हेक्टर जमिनीत पाण्याचं पुनर्संचयन करण्याचं ध्येय कंपनीनं ठेवलं आहे.
Yavatmal
Yavatmal
Updated on

यवतमाळ: दुष्काळग्रस्त आणि पाण्याची टंचाई असणाऱ्या भागात जमिनीत पाण्याचं पुनर्भरण करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या ‘ग्रीन पाथवे’ उपक्रमाचा विस्तार यवतमाळ जिल्ह्यात करण्यात येणार आहे. 'लॉरियल इंडिया'नं याची घोषणा केली आहे. (Yavatmal Loreal India Green Pathway programme 3000 farmer families will get water security)

Yavatmal
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची संपत्ती किती?

'फाऊंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी'सोबत (FES) भागीदारी करून 2021 पासून लॉरियल इंडियाकडून यवतमाळच्या घाटंजी ब्लॉकमध्ये हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामुळं इथल्या 2,500 हेक्टर निकृष्ट जमिनीत पाण्याचं पुनर्संचयन करण्यास मदत झाली आहे. यामुळं या प्रदेशातील पाणी साठवण्याची क्षमता 150 मिलियन लिटर्सनं वाढली आहे.

तसंच 1800 पेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना याचा शेतीसाठी फायदा झाला असून त्यामुळं त्यांची मिळकत 20 टक्क्यांनी वाढली आहे. सन 2026 पर्यंत आणखी 5,000 हेक्टर जमिनीत पाणी पुनर्संचयन करण्याचं ध्येय कंपनीनं ठेवलं आहे. त्यामुळं जमिनीत पाणी साठवण्याची क्षमता 300 मिलियन लिटर्सनं वाढून 85 गावांमधील आणखी 3,000 शेतकरी कुटुंबांना त्याचा फायदा होईल.

Yavatmal
Mumbai Goa Block: मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या कसे असतील पर्यायी मार्ग?

'लॉरियल इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक असीम कौशिक म्हणाले, “यवतमाळमध्ये पर्यावरणीय पुनर्संचयन करून सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्याचा आमचा निर्धार आता आणखीनच पक्का झाला आहे. जग सध्या ज्या आव्हानांना तोंड देत आहे, त्यांच्या निराकरणाचा आम्ही एक भाग बनू, असा आम्हाला विश्वास आहे. देशातील महत्त्वाच्या पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आम्ही आमच्या व्यवसाय प्रवृत्तींमध्ये बदल करून समाजात परिवर्तन आणण्यासाठी झटत राहू,” असंही कौशिक यांनी म्हटलं आहे.

Yavatmal
Varandha Ghat Closed: वरंधा घाट दीड महिना वाहतुकीसाठी राहणार बंद! जाणून घ्या कारण

फाऊंडेशन फॉर इकॉलॉजिकल रिस्टॉरेशनचे कार्यकारी संचालक सुव्रत कुमार सिंह म्हणाले, “गेल्या तीन वर्षांपासून आमच्या भागीदारीतून खुनी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जल सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नांत लक्षणीय प्रगती झालेली आम्ही पाहिली आहे. यानंतर आता मोठ्या वर्गापर्यंत हे महत्त्वाचं काम पोहोचवताना आम्हाला आनंद होत आहे. यवतमाळ जिल्ह्यालाही याचा फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.